आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेनं आगामी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला सूरूवात केली आहे.
आज काही मी भाषण करणार नाही. व्यासपीठावर तुमचं फक्त दर्शन घ्यायला आलो आहे. कारण खालून दर्शन होत नाही. निवडणूक कधीही लागतील. मात्र, अजून तरी काही निवडणुकीचे वातावरणात वाटत नाही. निवडणूक लागल्यावर सगळ्यांची पाक-पाक सुरु होईल, तेंव्हा आमचीही सुरू होईल, असा टोलाही राज यांनी सर्व पक्षांना लगावला. आज ते प्रभादेवी येथील मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
हे ही वाचा : “युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी आता शरद पवार उतरले मैदानात; दिल्या ‘या’ सूचना”
मी जेंव्हा सभा घेणार तेंव्हा इथेही सभा घेईन. ही शाखा आहे, दुकान नव्हे, इथे आल्यावर न्याय मिळायला हवा. एक पाटी मी सगळ्या शाखेला देणार आहे. तीच पाटी प्रत्येक मंत्र्यानांही पाठवणार आणि ती लावायला सांगणार आहे. शिवछत्रपतींचा संदेश मंत्रालयातल्या सगळ्या भागात पाठवणार आहे. कारभार ऐसे करावा की, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये, या संदेशाचे प्रत्येक जण तंतो-तंत पालन करेल, असंही राज यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू”
“शिवतीर्थवर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, राज ठाकरे आजोबा होणार”