आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात संजय राऊतांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना लवकरच उत्तर देणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
हे ही वाचा : …यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं; निलेश राणेंची टीका
“भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार, अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढ्यास ‘बळ’ मिळावे. मी काही दिवसांत त्यांना उत्तर पाठविणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, सोबतच त्याचे कारणही, असं संजय राऊत यांनी या पत्रात नमूद केले आहे.
श्री संजय राऊतनी माझे कौतुक केले आभारी आहे. ते म्हणाले
“भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले
मी काही दिवसात त्यांना उत्तर पाठविणार pic.twitter.com/8XwvKUrulN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीसांनी चार महिन्यात सरकार पडणार या स्वप्नातून बाहेर पडावं- अशोक चव्हाण
सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर टीका
मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; घाटकोपरमध्ये अनेकांचा मनसेत प्रवेश