मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता गुरुवारी आपण भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा सचिन सावंतांनी दिला आहे.
कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकर व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपा ची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर @mipravindarekar व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपा ची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू https://t.co/uslTrsvExP
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 26, 2021
दरम्यान, उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!” असं प्रविण दरेकरांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
मालकाच्या कर्तृत्वाचं असं जाहीर पोतेरं करू नये; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
“शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट”
“मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का! भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”
हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले