मुंबई : गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या मात्र या बैठकांतून यावर कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जाणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी-
“आता वर्ष उलटलं, 5 वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल”
एकीकडे आईचे आरोप तर.. दुसरीकडे मुलीचा तो व्हिडीओ व्हायरल
अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?; आशिष शेलारांची टीका
करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…