मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची विचारपूस केली होती. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत फेसबुक पोस्ट लिहली आहे.
‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार!, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.
शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो, असंही रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं”
शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणेंची सहकुटुंब ब्रीच कँडी रुग्णालयात हजेरी
शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…
“Video Call उचलताच तरूणी कपडे काढू लागली, आणि त्यानंतर…”