मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ध्यानात घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाच्या भरभक्कम शिफारशीसह पुढचे पाऊल टाकायला हवं होतं. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली आहे आणि समाजाला संकटात आणले आहे., अशी टीका चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
दरम्यान, जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला असा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आघाडी सरकारने केला आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं”
“ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत 2 हात करण्यात गेले”