Home पुणे “पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”

“पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष घाला अशी विनंती केली होती. त्यानुसार शरद पवार 13 ऑक्टोबरला माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत तर 16 तारखेला मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना कानपिक्या दिल्या.

शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“किरीट सोमय्यांनी लायकीत रहावं, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”

खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका; आमदार चंद्रकांत पाटलांच मोठ वक्तव्य

“कोण नाना अन् कोण दादा, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल”

किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स