आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पालघर : ‘राष्ट्रवादी परिवार संवादयात्रे’च्या चौथ्या पर्वाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल वसईतून केली. आज या यात्रेचा दुसरा दिवस असून जयंत पाटील यांनी डहाणू येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
डहाणू मतदारसंघात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही, स्थानिक पातळीवर बऱ्याच ठिकाणी पक्षाची चांगली कामगिरी आहे. आपण थोडा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्था तर टिकवूच मात्र विधानसभेतही एक चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो, असं सांगतानाच मी तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. जागं राहा आणि पक्ष वाढवा, असं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना म्हटलं.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान आज पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येथे स्थानिक पातळीवर पक्षाची कामगिरी उत्तम आहे. थोडा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेंसोबतच विधानसभेतही चांगला निकाल आपल्याला मिळू शकतो हा मला विश्वास आहे. https://t.co/0TakA5b2MP
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 23, 2021
हे ही वाचा : “दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राष्ट्रीय राजकारणात येणार”
संघटना आपल्याला बळकट करायची आहेच शिवाय आपलं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जागं करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे पाटील म्हणाले. प्रत्येक समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांवर कुणी दबाव टाकत असेल तर भाजप आंदोलन करेल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा टोला
नोकरीबाबत सल्ला घेण्यासाठी वडिलांनी शरद पवारांकडे नेलं- दिलीप वळसे पाटील
नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- संजय राऊत