आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभरातल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी काल मुंबईत 5 ठिकाणी मनसेच्या शाखांचं उद्घाटन केलं. यावेळी व्यासपीठावरून बोलताना राज यांनी उपस्थित मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
गाडीतून जाताना तुमचं दर्शन होत नाही. व्यासपीठावर येऊन तुमचं दर्शन घ्यावं, यासाठीच इथे आलो. खरंतर मला एक गोष्ट इथे घेऊन यायची होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक शाखेत, प्रत्येक कार्यालयात, सर्व शासकीय कार्यालयातही मी ती गोष्ट भेट म्हणून पाठवणार आहे. शिवरायांच्या एका पत्रातल्या दोन ओळी फ्रेम करून मी पाठवणार आहे., असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : …त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण
प्रत्येक शाखेच्या भिंतीवर ती गोष्ट लागली पाहिजे. कारण ती शाखा आहे, ते दुकान नव्हे. कसं वागावं, याबद्दल शिवरायांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातल्या या दोन ओळी आहेत, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती; आता नारायण राणे म्हणतात…
यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली
मनसेत सुसाट इनकमिंग, गोरेगाव येथील अनेक तरूण-तरूणींना हाती धरला मनसेचा भगवा झेंडा