पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या माजी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. या कारणामुळे शिवसेनेतून शैला गोडसे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर शैला गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाने केलेली कारवाई आपल्याला मान्य असून शिवसेना मी घराघरात पोहोचवली असल्याचं गोडसे यांनी म्हटलं आहे. एवढच नाही तर ही कारवाई त्यांना अपेक्षित होती. मात्र त्यांना झालेल्या जनतेकडूनच्या आग्रहामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पक्षातील कोणावरही गोडसे नाराज नसून त्या राजीनामा देण्याच्या तयारीत होत्या असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षाने त्यांना भरभरुन प्रेम दिलं आणि जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाने त्यांची मदत देखील केली असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”
देवेंद्र फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही- नवाब मलिक
“तब्बल 11 तासानंतर सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद
गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक- देवेंद्र फडणवीस