मला तर असा संशय आहे की, शरद पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे- निलेश राणे

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : भाजप नेते निलेश राणे यांनी आज बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मला तर असा संशय येतोय की, शरद पवारच दाऊदचा माणूस आहे, अशी शंकी निलेश राणेंनी यावेळी उपस्थित केली.

हे ही वाचा : “भाजप-शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते; गुलाबराव पाटलांनी आठवण उगाळली”

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत होते. मात्र त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. यावरून निलेश राणेंनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत, असं निलेश राणे म्हणाले. ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की, पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’, असा सवाल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

Budget 2022 : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल”

“शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”

उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here