आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी राष्ट्रवादीचे नेते तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
तत्कालीन फडणवीस सरकारनं केवळ घोषणा केली. मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असं विधान धनंजय मुंडेंनी यावेळी केलं. यावरून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते. हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनीही हसायला हवं होतं, असा टोला प्रीतम मुंडे यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
“पुण्यात अजित पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली?; अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा केला दावा”
‘सध्या भाजपा तणावग्रस्त आहे म्हणून…’; नाना पटोलेंची टीका
ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या
शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले