बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मलाही वाईट वाटलं, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.
स्वत:चा पाय तुटला म्हणजे दुसरा माणूस लंगडा व्हावा. ही आमची जात नाही. आम्ही असा विचार करत नाही. माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्नांसाठी आपण संघर्ष करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता ATM शिवायही काढता येणार पैसे; स्टेट बँकेंचा नवा उपक्रम
“एकवेळ माझ्या बाबांचं स्मारक करु नका, पण माझ्या शेतकऱ्यांना प्रश्नांकडे लक्ष द्या”
ज्यांनी पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या मुलीला पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यात कसं?- एकनाथ खडसे
“पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही”