Home नाशिक “वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय”

“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय”

नाशिक : वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..” असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे, ते नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते.

“आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत, एक संस्कृती आहे. शुभप्रसंगी आपण नेहमी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देत असतो. हा संस्कार महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे प्रत्येक प्रमुख नेत्याने राजकीय कार्यकर्त्यांवर केलेला आहे. हे काही शत्रूत्व टोकाचं नसतं. ही काय चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही. राजकारणात मतभेद असतात, पण त्यांच्या घरात एखादा मंगलप्रसंग असेल तर आपण त्यांना शुभेच्छा देतच असतो ना? यामध्ये राजकारणचा काय प्रश्न?, असं संजय राऊत म्हणाले.

मी असं म्हणालो की चंद्रकांत पाटील हे एक निरागस, निष्पाप व निषकपट व्यक्तिमत्व आहे. लहान मुलासारखं त्याचं मन आहे, अशा व्यक्तीला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, त्यांचा जन्मदिवस आहे ” असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा आरक्षण आंदोलन संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल”

मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांतदादांना सुनावलं

काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार आहेत- नाना पटोले

…त्यामुळे एक दिवस अजित पवारच हे सरकार पाडतील- रामदास आठवले