मी तुम्हांला शब्द देतो की…; मुख्यमंत्र्यांचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आश्वासन

0
514

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यानंतर ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. मात्रा कारवाई करत असताना त्यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यावेळी पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच त्यांना एक आश्वासन दिलं.

तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका. लवकर बरे व्हा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मला रोज रिपोर्ट येत असतो. उगाच त्यात राजकारण नको म्हणून फोन करणं, भेटणं टाळलं. आरोपींना कडक शिक्षा होणार. त्याची काळजी तुम्ही करु नका, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्पिता यांना सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…

बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकेल- संजय राऊत

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा जलवा, प्रवीण कुमारनं उंच उडीत पटकावलं राैप्य पदक”

“सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, 2 नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here