मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीची पत्रे राजभवनाला मिळाली नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ अणखी वाढला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मात्र शांत आहेत.
प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना प्रश्न विचारल्यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, असे सांगून पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काढता पाय घेतला.
त्यामुळे आता शरद पवार यांच्या डोक्यात नक्की काय राजकारण शिजत आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.
दरम्यान, राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. आता राष्ट्रवादीकडे आपले संख्याबळ सिद्ध करण्यासाठी 24 तासांचा अवधी आहे. त्यामुळे हे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का?, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.