Home महाराष्ट्र “असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही”

“असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी मला सांगितलं की, सभेनंतर शेतकऱ्यांच्या वतीनं राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक निवेदन देण्यात येणार आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हांला असे राज्यपाल भेटले नाही. मुंबईत लाखोंच्या संख्येने येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असं असताना राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. त्यामुळे आता हे निवेदन कुठं द्यायचं काय करायचं याचा विचार करावा लागेल, असं म्हणत शरद पवारांनी कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत सिंग राजपूतप्रमाणे ‘या’ स्टार अभिनेत्रीने केली आत्महत्या

“कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले

“मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये”

नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे हे अजित पवारांनी विसरू नये- निलेश राणे