आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दाैऱ्यावर होते. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. यामुळे औरंगाबादमध्ये मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे. यानंतर दाशरथे भाजपमध्ये प्रवेश कऱणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावरून सुहास दाशरथे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : वाघाला घाबरून पटकन म्याव, म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल; शिवसेनेचा नितेश राणेंवर पलटवार
मी पदासाठी लाचार होणारा, पदासाठी भांडणारा, कुठल्याही गटबाजी न करणारा असा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे ज्यावेळी माझे पद काढण्यात आले होते. त्यावेळी मी जी भूमिका घेतली होती तिच भूमिका आजही आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही, अशी प्रतिक्रिया सुहास दाशरथे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, ज्या वेळी माझ्याकडून जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आलं, त्याचवेळी मी माझी भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही. आणि सोडणारही नाही. राज ठाकरे यांनी मला जी जबाबदारी दिली आहे किंवा जी जबाबदारी ते मला देतील ती मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. मात्र मनसेतून मी जाणार नाही, असं दाशरथे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; पक्षप्रवेशानंतर ‘या’ नेत्यानं 3 महिन्यातच पक्षाला ठोकला रामराम”
“तुमचं सरकार घोटाळेबाज होतं, म्हणून तर तुम्हांला सगळीकडे घोटाळेच दिसतात”
‘…अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल’; एकनाथ शिंदेंचा इशारा