मुंबई : माझी बदललेली जबाबदारी तुम्ही पाहतच आहात. ही जबाबदारी मला तुमच्यामुळे भेटली असून मी या जबाबदारीतून पळून जाणारा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ते मुंबईतील मार्मिक वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलत होते.
भाषण करायची सवय आता जात चालली आहे. सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो अशी व्हायची. या शिवाय सुरुवात होऊच शकत नाही. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे अशा प्रणालीद्वारे आपण भेटत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचं शुक्लकाष्ट मागे लागलं आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम असा साजरा करत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, मराठी माणूस लढ्यासाठी कधी मागेपुढे पाहत नाही. कुणी अन्याय करत असेल तर त्याच्या छाताडावर पाय देण्याची हिम्मत मराठी माणूस दाखवतो. ही हिम्मत आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा; आठवलेंचा कविता शैलीत विरोधकांना इशारा
कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार; पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा
पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?; चित्रा वाघ कडाडल्या
“महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”