“माझ्याकडे सगळी माहिती आहे, पण…”; किम जोंग यांच्या प्रकृतीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

0
165

वाशिंगटन : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल सध्या अनेक शक्यता व्यक्त केल्या जात असून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल योग्य माहिती असल्याचं म्हटलं आहे.

मी तुम्हाला नेमकं सांगू शकत नाही. पण हो माझ्याकडे योग्य माहिती आहे. पण मी त्याबद्दल बोलू शकत नाही. मी फक्त ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट

उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…

लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे- सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here