मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नागरिकांनी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घराच्या आजुबाजूला फटाके जरुर वाजवावेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवू नयेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
Qualifier-2 : शिखर धवन-शिमरन हेटमायरची फटकेबाजी; दिल्लीचे हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य
फालतूगिरी बंद करा आणि….; निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका
अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे
असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल- रोहित पवार