‘माझी नको ती बदनामी केली; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

0
463

मुंबई : ‘भाजपच्या नेत्या चित्रा वाघ  यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली’, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख  यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरुर कासार पोलिस ठाण्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

“भाजपच्या नेत्या चित्रा वाघ 18 तारखेला शिरुरमध्ये आल्या होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते होते. यावेळी माझी बदनामी व्हावी या हेतूने त्यांनी मला बलात्कारी म्हटलं तसंच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी केली”, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की , 18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली, असेही शेख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात, हे समजून घ्या- नवाब मलिक

“लाईव्ह सेशन चालू असताना अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का; पहा व्हिडिओ”

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; संजय राऊत – राहुल गांधी भेटीमागचं कारण काय?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संभाजी भिडे यांची बैठक, बंददाराआड झाली चर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here