आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आजही लोकांमध्ये गेल्यानंतर मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. याच्या त्या विधानावरु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.
पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली बाब आहे. मी चार वर्षे मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या कधीही ध्यानात राहिलेले नाही. ही आमची कमजोरी आहे हे मी कबूल करतो, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय.
हे ही वाचा- “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”
सत्ता गेल्याची वेदना त्यांच्या मनात किती खोलवर गेली आहे हे यातून स्पष्ट होते. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेत गेलेले 13 आमदार स्वगृही परत”
देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा
ओबीसी आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला हे सगळ्यांनाच ठाऊक- धनंजय मुंडे