मुंबई : काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असं राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात करण्यात आला आहे. तसेच काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचंही आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही. कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हांला एकदा करावा लागेल, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, आम्हांला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”
पालकमंत्री बदला सांगली जिल्हा वाचवा; निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीकास्त्र
फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस
“शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”