आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेच्या 15 आमदारांना बंडखोरांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यातून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलं असल्याची चर्चा आहे. यावरून आता स्वत: आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझं नाव या नोटीसीतून वगळलं असल्याची चर्चा आहे. पण कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, 14 शिवसैनिक निष्ठावंत आहेत मी त्यांच्यासोबतच आहे. शिवसेनेचाच व्हीप अधिकृत असून त्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणारच., असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे म्हणाले, रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली, आता एकनाथ शिंदे म्हणतात…
दरम्यान, शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्यांनी राजीनामा द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे, आम्ही आजही तयार आहोत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना चांगलंच सुनावलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…
…या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं- गुलाबराव पाटील