अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

0
480

मुंबई : अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केलं होतं. याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबाद पण बदला, माझी काहीच हरकत नाही पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही म्हणजे तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे का?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मिटकरी यांना केला आहे.

अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

“शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी”

मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here