मुंबई : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? इतके दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, असा सवाल माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि ‘त्या’ 12 आमदारांचा संबंध काय?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य दुर्देवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार
“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, एकाला एक, दुसऱ्याला दुसरा न्याय नको- प्रवीण दरेकर
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”