भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील- विजय वडेट्टीवार

0
3

चंद्रपूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीवर दिल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, पण भाजप नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथं नैतिकता संपुष्टात येते, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, संजय राठोड हे मिडीया ट्रायलचे बळी पडले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली ते योग्य केलं. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी 

एक दिवस आपण या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं; काँग्रेस नेत्याकडून जयंत पाटलांना खास शुभेच्छा

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here