आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा (ईडी) कडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्यानं धाडी टाकण्यात येत आहेत. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आपण या धाडीला घाबरत नसल्याचं सांगितलं.
आपल्या नातेवाईकांच्या घरी जेंव्हा ईडीने धाड टाकली त्या रात्री आपण दिल्लीत होतो. धाडीच्या दिवशी रात्री 12 वाजता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यांना सांगितलं, मी दिल्लीत आहे. अटक करा. मी घाबरत नाही, असा खुलासा संजय राऊतांनी यावेळी केला. ते पुण्यात बोलत होते.
हे ही वाचा : 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच होते, मात्र दुर्देवानं…; रोहित पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
ईडी-आयटीच्या धाडी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर का पडतात, भाजपवर का पडत नाही? असा सवाल संजय राऊतांना यावेळी करण्यात आला. यावर संजय राऊतांनी 2024 नंतर त्याचं उत्तर देऊ. आमचेही दिवस येतील. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. 2024 मध्ये त्याचं उत्तर मिळेल, असं उत्तर संजय राऊतांनी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“आगामी निवडणूकीपूर्वी भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
राज ठाकरेंचा पत्राद्वारे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, आपल्याला भोंग्याचा प्रश्न आता…