Home महाराष्ट्र “मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”

“मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”

मुंबई : मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपावयाचं आहे. कौतुकाबरोबर वाईटपणा घ्यायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

राज्य सरकारकडून केली जाणारी कामं, उपाययोजना काही जणांच्या मनासारखं होत आहेत. ज्यांच्या मनासारखं होत आहेत, ते आशीर्वाद देत आहेत. माझं कौतुक करत आहेत.. मात्र, काहीजणांच्या मनासारखं होत नाहीय. साहजिकच आहे ते थोडेसे माझ्यावरती रागावले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबई यातील आकड्यात काहीशी घट झाली आहे पण इतक्यात भ्रमात राहायचं नाही, आकडे वरखाली होत राहतात. मी तपास करण्यास सांगितला आहे. मात्र आतापर्यंत जसं तुम्ही सहकार्य केसं तसं इथूनपुढेही करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्र आणि मुंबईमधील आकड्यात काहीशी घट, पण भ्रमात राहायचं नाही”

ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत

तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून?; निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

टाटा ट्रस्ट करणार पुन्हा देशाची मदत; आता देणार ‘इतक्या’ रुपयांचा निधी