“मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत”

0
192

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे. असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

दरम्यान, पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत”

“मुख्यमंत्री महोदयांनी ‘ही’ घटना डोळ्यांसमोर आणावी, म्हणजे राठोड सारख्या नराधम्याचा राजीनामा घेणं सोपं होईल “

संजय राठोड यांची अडचण वाढण्याची शक्यता; पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल

ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here