आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही त्याचं मला दु:ख नाही, असं म्हणाल्या.
हे देखील वाचा : क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. सत्तेत जनता असली पाहिजे. सत्तेत नाही याचं मला दु:ख नाही. तसेच मी कोणत्याही पदावर नाही, माझ्या हातात असतं तर शेतकऱ्यांना मदत केली असती, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
दरम्यान, मंत्री झाल्यावर जेंव्हा काम केलं तेंव्हा सर्व आठवणीत ठेवून काम केलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं- रूपाली चाकणकर
…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान
“…तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही”