Home महाराष्ट्र मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी...

मी शिवसेनेला घाबरत नाही; आमचं पण वरती सरकार पाहू सेना किती उडी मारते- नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

मी शिवसेनेला घाबरत नाही. आमचं केंद्रात सरकार पाहू शिवसेना किती उडी मारते. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. कानशिलात लावीन असे बोलणे कोणताही गुन्हा नसून दगडफेक करणे यात पुरुषार्थ नाही, असं नारायण  राणे यांनी म्हटलंय.

मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला, माझी बदनामी करत असला तर मी गुन्हा दाखवल करेन. सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही. मुख्यमंत्र्यांकडून देशाचा अपमान झाला आहे. असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे आक्षेपार्ह, चिथावणीखोर वक्तव्य करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल होत? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून देऊ”

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

आता या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये- अतुल भातखळकर