मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपनेते निलेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. त्यांच हे वॉर संपण्याचं नाव घेत नाहीये. निलेश राणेंनी दिलेल्या धमकीली रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
भरलेलं भांडं आणि मोकळं भांडं यामध्ये मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येतो. धमकीला मी अजिबात घाबरत नाही. शेवटी फक्त खोकल्या धमकीला कोण घाबरतो??, असं रोहित पवार म्हणाले. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.
दरम्यान, राजकारणात बसलेला पहिला शब्दिक झटका माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहतो, वेळोवेळी आपली लायकी काय ह्याची आठवण करत राहतो. पवार आडनाव असल्यामुळे मला कोण काही बोलणार नाही पण मी काही बोलू शकतो हे भ्रम तुटायला 48 तास पण लागले नाही, असं निलेश राणे म्हणले होते. त्यावर रोहित पवार यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
गरजू नागरिकांसाठी छगन भुजबळांनी केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी
सचिन की विराट? या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला…
मुख्यमंत्र्याशी चर्चा करायला लाज वाटते का?; शिवसेनेचा विरोधी पक्षाला सवाल
महत्वाच्या घडामोडी –
लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुखhttps://t.co/yJbTZCdehc@AnilDeshmukhNCP @NCPspeaks #cybercrime #मराठी
— घडामोडी (@ghadamodi1) May 23, 2020