औरंगाबाद : राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार टीकाटिप्पणी सुरु आहे. आता कोरोना निर्बंधांवरुनही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
‘कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपा आता स्वतःच्या बळावर मजबूत होत आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे, मोठ्याप्रमाणावर संघटन निर्माण होत आहे. ज्यांनी मोदींच्या नावाने मतं मागितली, भाजपाचं पाच वर्षे उत्तम राज्य चाललं त्याच्या आधारे त्यांनी मत मिळवली आणि 56 वर मुख्यमंत्री झाले, 54 वर उपमुख्यमंत्री झाले आणि 44 वर महसुलमंत्री झाले. अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
खेडमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका; भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती जाहीर
‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांनी अधिकाऱ्याला खडसावलं
‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला