आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एनसीबीच्या कारवाईवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. नवाब मलिक यांनी भाजप मुंबई शाखेचे माजी सरचिटणीस मोहीत कंबोज यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून निशाणा साधला होता. यावरून आता मोहीत कंबोज यांनी पलटवार केला आहे.
नवाब मलिक हे कचरा किंग आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी कुठेही उत्तर देण्यास तयार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत. तसेच नवाब मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं देखील कंबोज यांनी म्हटलं. यावरून आता नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे काही नेते मला अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठवणार आहेत आणि तो दावा 100 कोटींचा असल्याचे कळते आहे. तसेच भाजपाने माझी किंमत 100 कोटी रुपये ठरवली याचा आनंद होत आहे.
मोहित कंबोज काल म्हणाले की, नवाब मलिक भंगारवाला आहे, मला अभिमान वाटतो की, मी आणि माझे वडील भंगारचा व्यवसाय करत होतो. तो व्यवसाय कायदेशीर होता आणि कायदेशीर व्यवसाय केल्याचा अभिमान आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांना फटकारलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात मनसे करणार आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे मैदानात
बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांचा पवारांना इशारा
काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; चर्चांना उधाण
“अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”