पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
मी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची क्लीप मी ऐकली , तरीदेखील काही मुद्दे माझ्या मनात आहेत, त्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यासाठी लवकरच राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी पूर्ण ऐकली. माझ्या मनात काही मुद्दे आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी आपली भाषणाची सीडी पाठवतो ती भाषणं ऐका असं सांगितलं होतं. त्यानुसार मनसेकडून चंद्रकांत पाटलांना राज ठाकरेंच्या भाषणाच्या सीडी पाठवल्या. चंद्रकांत पाटलांनी ते भाषण ऐकून आता आपली प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पॅकेज घोषित केलं तर खरं, मात्र…; आशिष शेलारांचा घणाघात
‘फटे लेकीन हटे नही’, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना बीफचंही समर्थन करावं लागतंय- चित्रा वाघ
लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
“ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत”