Home महाराष्ट्र माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे

माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडले आणि, त्याहीपेक्षा नाट्यमय घटना म्हणजे ते पिस्तूल शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला. करूणा शर्मांवर अॅट्राॅसिटीचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. यातच जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्व प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!, असं पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांनीही पंकजा यांचे ट्विट रिट्विट केले. त्यामुळे धनंजय यांना कौटुंबिक पाठिंबा नसल्याचे सिद्ध झाले. इतके सर्व होत असताना धनंजय मुंडे शांत होते. मात्र, त्यांनीही फेसबुक पोस्ट करत आपण बहिणीच्या पाठिशी सदैव असल्याचे म्हटलं आहे.

रक्षाबंधन होऊन पंधरवडा उलटला तरीही राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी धनंजय मुंडे यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे आज धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांची भेट झाल्यानंतर अदिती यांनी त्यांना राखी बांधली. धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. माझ्या लहान भगिनी राज्यमंत्री कु.अदितीताई तटकरे यांनी आज राखी बांधली. यावर्षी कामातील व्यस्ततेमुळे आमचे रक्षाबंधन थोडे उशिरा साजरे झाले. माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, असं धनंजय मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान

बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव- देवेंद्र फडणवीस

राज्यातील आरोग्य केंद्रे बंद करून मंदीरे उघडू का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

“बेळगाव पालिकेवर भगवा फडकलाय?; मग बेळगाव, महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा”