“मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”

0
388

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालपासूनच अजित पवार यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज राज्यात लागले आहेत. त्यामुळे या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिटकरी यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात अजित पवार यांची भाषणे दाखवण्यात आली आहेत. अजित पवार यांचे सभा, संमेलानातील व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. तसेच अजितदादा यांना संघर्ष योद्धा संबोधत त्यांना निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तीमत्त्वही म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा शरद पवारांकडे वापसी”

दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

…त्यादिवशी नेमकं काय घडलं?; मणिपूरमधील पिडीत महिलेनं सांगितला घटनाक्रम, म्हणाली, पोलिसांनीच आम्हांला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here