“हैदराबाद हादरलं! मुस्लीम तरूणीशी लग्न केलं म्हणून हिंदू तरूणाची हत्या; तरूणी म्हणाली, माझ्या डोळ्यासमोर…”

0
440

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

हैदराबादमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमधील सरूरनगरमध्ये उघडकीस आली आहे.

नागराजू नावाच्या तरुणाची त्याच्या मेव्हण्याने रॉड आणि चाकूने भर रस्त्यात हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा : बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणे त्रास दिला, तेच आज…; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

नागराजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावचा रहिवासी होता, तर त्याची पत्नी सुलताना त्याच्या शेजारच्या घनापूर गावात राहत होती. दोघेही 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण सुलतानाचे कुटुंबाला त्यांचं नातं मान्य नव्हतं व ते नागराजूच्या विरोधात होते. त्यामुळे 31 जानेवारी रोजी नागराजू आणि सुलतानाने पळून जाऊन लग्न केलं आणि लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवलं. याचा राग मनात ठेऊन सुलतानाचा भाऊ आणि काही नातेवाईकांनी बुधवारी रात्री ती पतीसोबत स्कूटरवरून जात असताना तिच्यावर हल्ला केला.

दरम्यान, या घटनेनंतर सुलतानाने माध्यमांशी संवाद साधत, घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. आम्ही सिग्नलवर उभे असताना भावासह 5 जण तेथे आले. त्यांनी पतीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. ती ओरडत राहिली आणि तिला सोडण्यासाठी तीनं लोकांचे हातपाय जोडले पण कोणीही ऐकले नाही, असं सुलताना म्हणाली.

महत्वाच्या घडामोडी –

राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप नेत्याचं वक्तव्य

…तर राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजपच्या ‘या’ खासदाराचा इशारा

“तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here