भाजपाच्या ‘या’ महिला आमदारांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी

0
336

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा यांचा मुलगा आणि केज विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना एकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी केल्याचा प्रकार समोर आलाय.

दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे याचा फोन आला होता. त्याने फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगा केली. तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचं अक्षय मुंदडा यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी मुंदडा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कामावरुन हा प्रकार घडल्याचं अक्षय मुंदडा यांनी सांगितलं. त्यावेळी आपण फोनवर संभाषण रेकॉर्ड केल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांच्या आठवणीने साबणे यांना अश्रू अनावर; म्हणाले…

तारक मेहता का उल्टा चष्मातील नट्टू काका यांचं निधन

शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक सल्ला

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनांचा हात; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here