नवी दिल्ली : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार केलं आहे. यावरून आता पोलिसांचं वर्तन चूक की बरोबर याची चर्चा आता सुरू झाली आहे. मानवधिकार आयोगाने हैदराबाद एन्काऊंटरची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या ठिकाणी एन्काऊंटर झाला त्या ठिकाणी जाऊन आणि नेमक्या कोणत्या कारणासाठी एन्काऊंटर करण्यात आला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं मानवधिकार आयोगाने सांगितलं आहे.
पोलिस तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घडल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे
दरम्यान, एन्काऊंटनंतर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या निरनिराळ्या प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं”
हैदराबाद बलात्कार प्रकरण; “आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल”
हैदराबाद आरोपीं एन्काउंटरवर प्रकरणी ‘निर्भया’च्या आईची प्रतिक्रिया
ज्या ठिकाणी बलात्कर केला.. त्याच ठीकानी एन्काऊंटर झाला; हैदराबाद प्रकरणी आरोपींचा एन्काउंटर