Home महाराष्ट्र “राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

“राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने करोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं कोरोनामुळे निधन

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबी संघात ‘आदित्य ठाकरे’

…मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?; संजय राऊतांचा सवाल

प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल