Home महाराष्ट्र रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

रेमडिसिवीर फक्त भाजपच्याच नेत्यांना कसे मिळतात; हसन मुश्रीफांचा सवाल

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. अशातच ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेड या गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. तसेच ऑक्सिजनअभावी काही रूग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

वास्तविक हे इंजेक्शन फक्त भाजपलाच कसे मिळाले? राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे दीव दमणला जातात आणि त्या कंपनीला भेटतात. 50 हजार इंजेक्शन त्यांना मिळतात. त्याचे पैसे भाजप द्यायला तयार होते. सुजय विखे पाटील विमानाने जातात. त्यांना इंजेक्शन मिळतात. हे चाललंय काय? जर केंद्र सरकार या सगळ्याचं नियंत्रण करत असेल, तर मग फक्त भाजपच्याच लोकांना इंजेक्शन द्यायचं ठरवलंय का त्यांनी? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, हसन मुश्रीफ हे कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

सर्व इंजेक्शन्स आधीच वाटली आहेत, आता रिकामी खोकी घेऊन जाऊ शकता- सुजय विखे

मुंबईत कोरोना रूग्णांचा आकडा लपवला जातोय; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

RCB Vs DC ! दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

“…तर आम्ही रूग्णांचे नातेवाईक आणि डाॅक्टर्संना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता”