सांगली : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधालाय. अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी मिटकरी बोलत होते.
“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन”
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”
महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल