आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावरून भाजपाकडून टीका केली जात असताना शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावरून संजय राऊतांनी अनेकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आज देखील पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपावर टीका केली, यानंतर देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीचे नेते, पण भाजप मनातून जाता जाईना!
“संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतायत, त्यांचे किती निवडून आले? 56 निवडून आले आहेत. त्यांचा 40-42 टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा 70 टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेचं खळखट्याक, वसईत मनसेने केला भेसळयुक्त तेलाचा पर्दाफाश; पाहा व्हिडिओ
…म्हणून ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अतुल भातखळकर यांची पोलिसांत तक्रार
काँग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार