मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आणी शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे, या सगळ्या घडामोडींवरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान जयंत पाटील यांनी यावेळी केलं. ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : ‘लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही…’; रुपाली चाकणकरांनी ट्विट करत केलं उद्धव ठाकरेंचं समर्थन
हे सरकार किती दिवस टिकणार आणि 2024 साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय 2024 आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल, असा टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत नाही”
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, म्हणाले…