मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावणार होत्या. पण राज्य सरकारनं चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले. ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कोणता आणि कसला हा राग काढला?,” असं सवाल करत आशिष शेलार यांनी केले ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही?
प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले?
ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर
कुठला आणि कसला हा राग काढला?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 11, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे