Home महत्वाच्या बातम्या “हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

“हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : “शिवसेनेचं हिंदुत्व आजही अबाधित आहे, अशी आशा आहे. पण आज आपल्या हिंदुत्वावर संकट ओढावलेले दिसत असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता?, असा सवाल करत राज्य सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणे आहे. असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे

दरम्यान या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटलेला असतानाही आपणांकडून काही ठोस पावलं उचलली जाऊ नये हे दुर्दैवी”,असंही लाड म्हणाले.

उद्धव साहेबांना माझी कळकळीची मागणी आहे कि आपण तत्काळ महिला अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा. आपली भूमिका जनतेसमोर मांडावी आणि आपल्या हिंदू माता-भगिनींवर येणारे धर्म संकटाचे सावट दूर करावे, अशी मागणी ही प्रसाद लाड यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आमदार व्हायचा प्रयत्न करू नका नाहीतर…; मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरेंना जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक! मुंबईत अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण; निगवे खालसा गावचे संग्राम पाटील शहीद