आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह 22 कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसह सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. यावरुन भाजपा आमदार राम कदम यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयू मध्ये केलं दाखल
“माननीय शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? आणि जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत? केवळ एकच निदान माफक अपेक्षा,” असं राम कदम म्हणाले आहेत.
दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून संप पुकारला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
टोपेजी, इतकेही निर्बंध लादू नका की, जीवच नकोसा होईल- चंद्रकांत पाटील
शिवसेनेनं फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, त्यांनी भाजपसोबत जावं- रामदास आठवले
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रूपाली भोसलेही कोरोना पाॅझिटिव्ह; सध्या झाली क्वारंटाईन”